ट्यूशनला निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लाॅनवर नेले; अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिंगणघाट येथे घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हिंगणघाट (Hinganghat).  शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिंगणघाट येथे घडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    येथील श्रीमती शिरेकुवरदेवी मोहता विद्यालय कन्या शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीला शुभम अंबोरे रा. इंदिरा गांधी वार्ड, संतोषी माता चौक हिंगणघाट याने जबरदस्तीने बसवून नेत तिच्यावर मोदक लॉन येथे अत्याचार केले. आरोपी हा पीडित मुलीचा नेहमी पाठलाग करीत असायचा. यापूर्वी जुलै 2019 मध्ये ती शाळेत जात असताना रेल्वे स्टेशनजवळ भेटला व आपण फिरायला जाऊ म्हणून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अल्लीपुर गावाशेजारी असलेल्या शेतात नेऊन जबरदस्तीने कुकर्म केले. त्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ सोडून दिले.

    कोणालाही काही सांगु नकोस, नाही तर तुझी बदनामी करेल व जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडिततेने घरी घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतरही असाच प्रकार तो वारंवार करायचा. सदर पीडिता 24 मार्च 2021 रोजी ट्युशनला जात असताना मध्येच तिला अडवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मोदक लॉन हिंगणघाट येथे नेऊन कुकर्म केले.

    ट्युशनवरून घरी परत यायला उशीर झाल्याने घरच्यांनी विचारले असता घडलेला प्रकार आईजवळ सांगितला. त्यानंतर आई- वडिलांनी सोबत जाऊन हिंगणघाट पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हयाची नोंद करून आरोपीचा शोध घेत आहेत.