पथदिव्यांचे विद्युत देयके त्वरित माफ करा; आमदार दादाराव केचे यांची मागणी

महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठविली आहे. बिल न भरल्याने महावितरणच्यावतीने ग्रामपंचायतचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

    आर्वी (Arvi).  महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठविली आहे. बिल न भरल्याने महावितरणच्यावतीने ग्रामपंचायतचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वीजबिल माफ करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.

    महावितरण कंपनीने ग्रापंचायतींच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला. याचा त्रास स्थानिकांना होत आहे. सरपटणारे विषारी प्राण्यांपासून मनुष्य, पाळीव जनावरे व इतरोना त्रास होत आहे. यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा उर्जा मंत्री नितीन राऊत यांना मेल व्दारे पत्र पाठविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिव्यांचे संपूर्ण विद्युत देयके माफ करून संभाव्य जीवित हानी टाळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. असे न झाल्यास आंदोलनाचा नाईलाजाने मार्ग पत्करावा लागेल, असे आमदार दादाराव केचे यांनी म्हटले आहे.

    कोविड–19चे भयावह वास्तविकतेला समोर जात बिघडलेल्या आर्थिक घडी बसविता नाकी नऊ आले आहे. त्यात शासनाच्या तुगलगी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. त्यात अव्वाच्या सव्वा विद्युत देयके विद्युत वितरण कंपनी पाठवित आहे. आर्थिक परिस्थिती कसीही असली तरी त्याचा विचार न करता सरळ सरसकटपणे विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था वित्त आयोगाचा निधी तथा वसुल होणाऱ्या करावर अवलंबून आहे. इतर सेज कर त्यांना मिळत नाहीत. ग्रामपंचायती वीज बिल भरण्यास असमर्थ आहे. त्यामुळे पथदिव्यांचे विद्युत देयके त्वरित माफ करावे. खंडीत करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी दिला आहे.