रमाई घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले घर
रमाई घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले घर

परिस्थितीशी झगडत जगण्यावर मात करीत रमाई घरकुल योजनेअंतर्गत घराचे काम पूर्ण केले. मात्र अनुदानाचा निधी अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे मार्फत संबंधित गट विकास अधिकारी यांना निवेदन देत अनुदानाचा निधी देण्याची मागणी केली आहे.

वडनेर (Wadner).  परिस्थितीशी झगडत जगण्यावर मात करीत रमाई घरकुल योजनेअंतर्गत घराचे काम पूर्ण केले. मात्र अनुदानाचा निधी अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे मार्फत संबंधित गट विकास अधिकारी यांना निवेदन देत अनुदानाचा निधी देण्याची मागणी केली आहे.

हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडनेर गावात रमाई घरकुल योजने अंतर्गत 53 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. त्यांनी उसनवारीवर रक्कम घेऊन घरकुलाचे बांधकाम सुरू केले. काही लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम शासनाचा निधी येणार म्हणून पूर्णत्वास नेले. मात्र घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही शासनाचा निधी अजूनही लाभार्थ्याच्या खात्यात जमा न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घरकुलाचे बांधकाम करणा-या लाभार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. महिन्याला केवळ पंधराशे रुपये कमविणा-या लाभार्थ्यांना परिस्थितीची अवस्था पाहून विखुरलेल्या कुटुंबाला सावरण्याचे काम शासनाचे आहे. असे असतांनाही घरकुल योजनेच्या कुटुंबीयापर्यंत निधी न पोहोचल्याने कुटुंबाच्या आवश्यक प्राथमिक गरजाही पूर्ण होताना दिसत नाही.

राहायला घर नसतानाही रमाई घरकुल योजनेमधून घरकुलाचे स्वप्न पूर्ण केले. अशी परिस्थिती असतानाही जीवन जगायचे कसे? असा प्रश्न योजनेच्या लाभार्थ्या समोर उभा ठाकला आहे. घरकुलाचे स्वप्न साकार झाले आहे. मात्र आता शासनाने या घरकुलाचा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वळता करावा, अशी मागणी वडनेर ग्रामपंचायतच्या सरपंच कविता विनोद वानखेडे यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.