लहान मुलांचे गांधीगिरी आंदोलन
लहान मुलांचे गांधीगिरी आंदोलन

देवळी (Deoli): मागील काही दिवसांपासून महालक्ष्मी कंपनी विरोधात प्रदूषण आणि कामगारांच्या मागण्या घेऊन युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. प्रदूषणाने देवळी शहरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. तसेच लहान मुलांमध्ये दमा, अस्थमा, त्वचेचे रोग,डोळ्यांचे आजार या सारखे अनेक गंभीर आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यातच आज सकाळी अचानक पणे महालक्ष्मी टी एम टी प्रा लि कंपनी समोर देवळीतील प्रदूषणाने त्रस्त असलेल्या लहान मुलांनी गांधीगिरी स्वरूपाचे आंदोलन केले.

  • घोषवाक्य लिहिलेले फलक ठरले लक्षवेधी

कंपनीच्या गेट समोर सकाळी ठीक १० वाजता देवळीतील १५ ते २० लहान मुलांनी हातात निषेधार्थ घोषवाक्य लिहिलेले फलक घेऊन महालक्ष्मी कंपनीच्या प्रदूषणा विरोधात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले. निषेध फलकावरील लिहिलेले घोषवाक्य ‘कंपनी हवी,प्रदूषण नको’, आमच्या हक्काची शुद्ध हवा कुठे हरवली ?”,”निदान आमची पिढी तरी प्रदूषणाने उध्वस्त करू नका”, “आमच्या शुद्ध हवेला प्रदूषित करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? अशा घोषवाक्यांनी कंपनी प्रशासन व कामगारांचे लक्ष वेधून घेतले होते.लहान मुलांनी प्रदूषणा विरोधात एल्गार पुकारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रक मंडळाने कंपनीवर तातडीने कारवाई करून थेट कंपनीतुन सोडण्यात येणारे प्रदूषण थांबविण्याची व चिमणीची उंची वाढवायची मागणी देवळीतील नागरिक करीत आहे.