घोरपडीचे तस्करी प्रकरण
घोरपडीचे तस्करी प्रकरण

घोरपडीची हत्या करुन तिला भाजून तस्करी करण्यात आली. या गुन्ह्यासंबंधातील तीन जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. ही घटना बेढोणा परिसरात अलीकडेच उजेडात आली. या प्रकरणी न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची वनकोठडी देण्याचे आदेश दिले आहे.

आर्वी (Arvi).  घोरपडीची हत्या करुन तिला भाजून तस्करी करण्यात आली. या गुन्ह्यासंबंधातील तीन जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. ही घटना बेढोणा परिसरात अलीकडेच उजेडात आली. या प्रकरणी न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची वनकोठडी देण्याचे आदेश दिले आहे.

बेढोणा परिसरात घोरपडीची तस्करी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयावरुन वनविभागाने बेढोणा येथील तिघांना ताब्यात घेतले आहे.संशयितांमध्ये पंजाब श्रावण सनिसे, रामदास लक्ष्मण सावंत व सुरेश उत्तम सावंत यांचा समावेश आहे. दोन घोरपडीची हत्या करुन तिला भाजण्यात आले. त्यानंतर नाल्याच्या किनारी प्लास्टिक पिशवीमध्ये तिला ठेवण्यात आले.वनविभागाच्या चमूने घटनास्थळावरुन पिशवीमधील घोरपडीचे मास जप्त केले आहे. इतकेच नव्हे तर दोन सत्तुर जप्त करण्यात आले. आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांनाही प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली. ही उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एन.एस़ जाधव यांच्या नेतृत्वात वनपाल डेहनकर, कावळे, नितनवरे, वनरक्षक गजभिये व कर्मचा-यांनी केली. यापूर्वीही परिसरात घोरपडीची तस्करी झाल्याची घटना उजेडात आली होती. घोरपडीचे तेल बाजारात महाग विकल्या जाते. यामुळे शिकारी घोरपडीची हत्या करुन तस्करी करीत असतात. इतर महत्वपूर्ण माहिती उजेडात येणार असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.