सततच्या पावसामुळे कपाशीचे झालेेले नुकसान
सततच्या पावसामुळे कपाशीचे झालेेले नुकसान

रसुलाबाद (Rasulabad) : सततच्या पावसाने सोयाबीन ,कापूस ,तूर , भाजीपाला याच्या सह अनेक खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मोठया प्रमाणात फटका बसला आहे. आतातर कपाशीच्या बोंडातील सरकीलाच अंकुर फुटले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहे.

  • शेतकरी आर्थिक संकटात सापडला

रसुलाबाद (Rasulabad) :  वर्धा जिल्ह्यातील रसुलाबाद येथे झालेल्या सततच्या पावसाने सोयाबीन ,कापूस ,तूर , भाजीपाला याच्या सह अनेक खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मोठया प्रमाणात फटका बसला आहे. आतातर कपाशीच्या बोंडातील सरकीलाच अंकुर फुटले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहे.

यावर्षी सततच्या पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने सोयाबीन पिवळे पडून खोडमाशीचा प्रादूर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले आहे. आतातर रसुलाबाद परिसरात काही शेतक-यांच्या कपाशीच्या बोंडातील सरकीच अंकुरली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची अधिक चिंता वाढली आहे. पावसामुळे काही ठिकाणच्या कपाशीचे बोंड अतिपावसाने खराब झाली असून काळे पडले आहे. अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.

कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यात हे नवीन संकट आल्याने धास्ती वाढली आहे. पांढरे सोने म्हणून कपाशी पिकांकडे पाहिले जाते. कपाशी हे नगदी पीक असुन आहे. या पिकावर शेतक-यांचे वार्षिक नियोजन असते. शेतकरी कापूस , सोयाबीनच्या उत्पादनातून संसाराचा वर्षभर गाडा चालवित असतो. परंतू शेतक-यांवर संकटावर संकटे कोसळत असताना आता पुढे काय करावे असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकला आहे.