हीच ती शेळ्या चोरणारी टोळी
हीच ती शेळ्या चोरणारी टोळी

वर्धा (Wardha): देवळी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गावात शेळया चोरी करणा-या टोळीस पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून एकूण 35 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजू सयाम (19), अक्षय पाटील (23), रंजित पारिसे (20) सर्व रा. देवळी यांचा समावेश आहे.

देवळी तालुक्याच्या कोल्हापूर येथील गजानन जुमडे यांचे तक्रारीवरून शेळया चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना माहितीचे आधारे आरोपितांना देवळी येथुन ताब्यात घेण्यात आले. कसून विचारपूस केली असता आरोपीतांनी संगनमत करून अडेगाव येथून चार, वाटखेड येथून एक तसेच कोल्हापूर सिंगरवाडी येथून एक अशा सहा शेळया चोरी केल्याची कबुली दिली. या शेळया आंजी अंदोरी येथील किसन मांढरे याचे गोठ्यात ठेवल्याचेही पोलिसांना सांगितले. सहा शेळया व दोन पिल्ले असा एकूण 35 हजार रूपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. तिनही आरोपींचे विरोधात देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नीलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे प्रमोद जांभूळकर, दीपक जाधव, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, तुषार भुते यांनी केली.

हीच ती शेळ्या चोरणारी टोळी