Wardha. As per the government directive, chemical fertilizers must be sold to the farmers with the help of POS machines. However, due to irregularities, the administration has taken action against 18 agricultural centers. His license has been revoked for six months. This action has created a stir among the agricultural center operators.
कृषी केंद्र, वर्धा

  • कृषी केंद्रांचा ६ महिन्यासाठी परवाना रद्द

वर्धा (Wardha).  शासकीय निर्देशानुसार रासायनिक खत शेतक-यांना पॉस मशीनच्या सहायाने विक्री करणे आवश्यक आहे. परंतु, यात अनियमितता करण्यात येत असल्याने प्रशासनाने १८ कृषी केंद्रावर कारवाई केली आहे. त्यांचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याकारवाईमुळे कृषी केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात वर्ष २०२०-२१ खरिप हंगामाकरिता एप्रिल ते जुलै दरम्यान मोठया प्रमाणात युरिया खताची विक्री करण्यात आली. यात खरेदी करणारे २० शेतकरी व विक्री करणारे कृषी केंद्र चालकांची चौकशी करण्याची सूचना प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी समुद्रपूर तालुक्यातील काही कृषी केंद्राची पाहणी करण्यात आली. यात काही ठिकाणी अनियमितता आढळून आली. याची जबाबदारी उपविभागीय कृषी अधिका-यांना देण्यात आली. प्राप्त सूचनेनुसार खताची विक्री करतांना पॉस मशीन असणे आवश्यक होते. परंतु, संबंधित कृषी केंद्रावर एकाच शेतक-याचे नाव व आधारचे सहायाने युरिया खताची विक्री करण्यात आली. याचा अहवाल हिंगणघाट व वर्धेचे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी जिल्हाधिका-यांना पाठविला. यावर परवाना अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दोन दिवस ९ व १० सप्टेंबरला सुनावणी घेण्यात आली. युरिया विक्रीत अनियमितता करण्यात आल्याचे आढळून आल्याने १८ कृषी केंद्र चालकांचा परवाना ६ महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे.

या कृषी केंद्राचा समावेश परवाना रद्द करण्यात आलेल्या कृषी केंद्रामध्ये वर्धा तालुक्यातील डेकाटे कृषी केंद्र करंजी (भोगे), श्री लक्ष्मी कृषी केंद्र सेवाग्राम, मे़ अरुण सिड्स एण्ड पेस्टीसाईड देवळी अंतर्गत मे़ किसान एग्रो कृषी केंद्र पुलगांव, मे़ वैशाली कृषी केंद्र सेलू, मे़ पराग कृषी केंद्र सेलू, मे़ पंकज कृषी केंद्र हमदापुर, हिंगणघाट केंद्रांतर्गत मे़ बलदेव कृषी केंद्र अल्लीपुर, मे़ साखरकर कृषी केंद्र काचनगांव, मे़ आदर्श कृषी केंद्र पवनी, मे़ भोजाजी कृषी केंद्र लहान छोटी, मे़ अमोल कृषी केंद्र वडनेर, मे़ हरिओम अॅग्रो ट्रेडर्स, मे़ श्रीनाथ कृषी केंद्र, समुद्रपूर येथील मे़ शुभम कृषी केंद्र, मे़ बाभुळकर कृषी केंद्र, मे़ जैन कृषी केंद्र व मे़ गौळकर कृषी केंद्र गिरडचा समावेश आहे.