पदवीधर मतदार संघाच्या आज झालेल्या निवडणुकीत मतदान करताना कोरोनाबाधित रुग्ण
पदवीधर मतदार संघाच्या आज झालेल्या निवडणुकीत मतदान करताना कोरोनाबाधित रुग्ण

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या आज झालेल्या निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १५०६८ मतदारांनी मतदान केले. तीन कोरोना बाधित मतदारांनी सुद्धा मतदान केले.

संजय तिगावकर
वर्धा (Wardha).  नागपूर पदवीधर मतदार संघाच्या आज झालेल्या निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १५०६८ मतदारांनी मतदान केले. तीन कोरोना बाधित मतदारांनी सुद्धा मतदान केले.

आज सकाळी आठ वाजता पासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळी दहा वाजेपर्यंत नऊ टक्के, बारा वाजेपर्यंत २१ टक्के, चार वाजता ५६ टक्के आणि मतदान पाच वाजता संपल्यानंतर ६५ टक्के मतदारांनी मतदान केले होते. २३ हजार ६८ मतदारांपैकी ९९८० पुरुष मतदार तर पाच हजार ८२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नवरदेवाने आणि तीन कोरोनाबाधित रुग्णांनी केले मतदान

पीयूष मुरारका यांचाआज वर्धा येथे विवाह होता. विवाहाचे सोपस्कार आटोपल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील लोक महाविद्यालय येथील १९४ क्रमांकाच्या केंद्रावर ३ कोरोनाबाधित मतदारांनी पीपीई किटचा वापर करून मतदान केले.