कंटेनरची कारला धडक; शहरातील कलोडे चौकातील घटना

हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील कलोडे चौकात हैदराबादकडून गुडगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने अल्लीपूरवरुन हिंगणघाटकडे आलेल्या कारला मागाहून जबर धडक दिली.

    हिंगणघाट (Hinganghat).  शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील कलोडे चौकात हैदराबादकडून गुडगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने अल्लीपूरवरुन हिंगणघाटकडे आलेल्या कारला मागाहून जबर धडक दिली. ही घटना शुक्रवारी 30 एप्रिलच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

    कंटेनर क्रमांक एच. आर. 55 पी. जे. 7736 हा हैदराबादकडून गुडगावकडे भरधाव वेगाने जात होता. याचदरम्यान एम.एच. 29 आर 1530 क्रमांकाच्या कारने चालक संजय गिते हे हिंगणघाटला येत होते. यावेळी कंटेनरने कारला मागाहून जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात घडताच कंटेनर चालक कंटेनर सोडून पसार झाला.

    या अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस ठाण्याचे ठाणेदार संपत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, नितीन राजपूत, दिपक हाके, आकाश कांबळे आदीनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या कडेला बाजूला करून कंटेनर ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.