शेतकरी विरोधी कृषी कायदे तत्काळ मागे घ्या; शेतकरी आंदोलन समन्वय समितीची मागणी

केंद्र सरकारने पारित केलेले तिनही कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून या कायद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायदे तत्काळ मागे घेण्यात यावे. अशी मागणी वर्धा जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्यामार्फत पंतप्रधान यांचे नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.

  • जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

वर्धा (Wardha). केंद्र सरकारने पारित केलेले तिनही कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून या कायद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायदे तत्काळ मागे घेण्यात यावे. अशी मागणी वर्धा जिल्हा शेतकरी समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्यामार्फत पंतप्रधान यांचे नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचे मागणीसह शेतमालाला किफायतशीर हमीभाव आणि शेतकरी कर्जमुक्ती विधेयकांचा समावेश असलेली विधेयके मंजूर करावीत. शेतीमालाबाबत नियमांचे उल्लंघन करणा-या व्यापारी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. केवळ तोंडी आश्वांसने देण्याऐवजी त्याचा कायद्यात सहभाग करण्यात यावा. देशातील शेती उत्पादनांची खरेदी, साठवणूक प्रक्रिया, मूल्यवाढ आणि विपणन याकरिता शेतकरी सहकारी संस्थांना प्रोत्साहन द्यावे. तसेच कामगार विरोधी पारित केलेली विधेयकेही रद्द करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

या धरणे आंदोलनात अविनाश काकडे, संजय इंगळे तिगावकर, हरीश इथापे, यशवंत झाडे, योगेश घोगरे, प्रा. प्रवीण काटकर, सुरेश बोरकर, समीर राऊत, डॉ. रामकृष्ण मिरगे, सुनील ढाले, रविशंकर बारहाते, अजय घंगारे, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, भाऊराव काकडे, महेंद्र मुनेश्वर, नितीन झाडे, पंकज इंगोले, भरत कोकावार, प्रकाश पाटील, रवींद्र सुर्वे, शेख कलाम, तुलसीदास वाघमारे, सुनील फरसोले, अॅड. डी. जी. मेहरे, धनंजय वादाफळे, सचिन गौळकार, प्रवीण पेठे, प्रतीक्षा हाडके, विक्की सवाई, कॉ. असलम पठाण, कॉ. सुरेश गोसावी, कॉ. रामभाऊ दाभेकर, रत्ना भेंडे, जयश्री लोहवे, गजेंद्र सुरकार, किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, समाधान पाटील, अरूण गावंडे, अमृत मडावी, वासुदेव वरघरे, गजानन सातपुते, श्रेया गोडे, वंदना कोळणकर, अरुणा नागोसे, शुभांगी बांगडे, रत्नफुला ढगे, गोदावरी राऊत, बी. एस. गुप्ता, एन. टी. गुजरकर, विलास ढोकणे, मदनसिंग धमाने, विजय गव्हाणे, चुडाराम घवघवे, समीर बोरकर, रामराव वाघमारे, कांचन हिंगे, दुर्गा काकडे, मारोतराव इडमवार, मारोतराव गाडगे, सुधीर सहारे, रमेश खेडकर, दिवाकर शंभरकर, संजय कापसे, राजेश तायवाडे, निलेश सियाम, व्यंकट बुंदे, विजय गवई, प्रभाकर धवने, भूमिकांत मोहर्ले, रजनी सुरकार, विनोद अवथळे, अथर्व भिंगारे, अतुल उडदे, पंढरीनाथ उडदे, डॉ. शरद सावरकर, प्रवीण बन्सोड, विजय तेलंग, अरूण पचारे यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.