वर्धा जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कोविडने गाठला नीचांक; आढळले फक्त चार कोरोना बाधित

जिल्ह्यात सक्रिय कोविड बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण होत असून आज गेल्या सहा महिन्याच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. कोविड बाधितांच्याआज आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात फक्त चार रुग्णांची नोंद केली आहे.

वर्धा (Wardha).  जिल्ह्यात सक्रिय कोविड बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण होत असून आज गेल्या सहा महिन्याच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. कोविड बाधितांच्याआज आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात फक्त चार रुग्णांची नोंद केली आहे.

कोरोनाबाधितांमध्ये वर्धा 2, हिंगणघाट 1 व सेलू तालुक्यातील 1 रूग्णाचा समावेश आहे. आर्वी, देवळी, आष्टी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात कोरोना आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही. कोरोना बाधितांमध्ये 1 पुरूष व 3 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांमध्ये 8 हजार 931 रूग्णांचा समावेश आहे. आज 20 तर आतार्पत एकूण 8 हजार 367 जण कोरोना आजारातून मुक्त झाले आहे. आतापर्यत एकूण 268 रूग्णांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्हयातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 295 झाली आहे.