वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे ८१ रुग्ण, कोरोना नसलेल्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने चिंता वाढली; एकाचा मृत्यू

वर्धा (Wardha) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (the number of corona patients) कमी होत असली तरी सध्या म्युकरमायकोसिसचे (Wardha Mucormycosis Patients Increases) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ८१ रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोव्हिडमुक्त नसलेल्या तिघांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे.

  वर्धा (Wardha). जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (the number of corona patients) कमी होत असली तरी सध्या म्युकरमायकोसिसचे (Wardha Mucormycosis Patients Increases) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोव्हिडमुक्त नसलेल्या तिघांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे.

  जिल्ह्यात आतापर्यंत 81 म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी 19 व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या 61 व्यक्तींवर उपचार केले जात आहेत.

  आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे 39 बाधित हे 45 ते 60 वयोगटातील आहेत. तर 18 ते 45 वयोगटातील 20 रुग्ण आणि 60 पेक्षा जास्त वयोगटाच्या 22 रुग्णांचा समावेश आहे. 81 म्युकरमायकोसिस बाधितांपैकी 56 व्यक्तींना या आजाराची लागण होण्यापूर्वी प्राणवायू द्यावा लागला होता. उर्वरित 25 रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला नव्हता. तर कोव्हिडचा संसर्ग झाल्याने गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी स्टेरॉईड दिले जाते.

  अशाच 38 रुग्णांना म्युकरमायकोसिस झाल्याचे निदान झाले आहे. असे असले, तरी उर्वरित 43 म्युकरमायकोसिस बाधितांची स्टेराॅईड थेअरपीबाबतची हिस्ट्री नाही.आढळलेल्या रुग्णांमध्ये 62 पुरुष तर 19 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

  81 म्युकरमायकोसिस बाधितांपैकी 78 व्यक्तींना यापूर्वी कोव्हिडचा संसर्ग झाला होता. तर तीन व्यक्तींना कोव्हिडचा संसर्ग झाला नसला तरी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोव्हिडसोबतच म्युकरमायकोसिसबाबत दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.

  81 म्युकरमायकोसिस बाधितांमध्ये मधुमेह असलेल्या 68, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले 28, तर दीर्घकालीन आजार असलेल्या 29 व्यक्तींचा समावेश असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

  म्युकरमायकोसिसचा कोणाला अधिक धोका?
  बुरशीजन्य संसर्ग असलेला म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने मधुमेह, वयोवृद्ध तसेच पूर्वीचे विविध आजार असलेल्यांना होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी हा आजार जीवघेणा ठरणाराच आहे. त्यामुळे कोव्हिड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे सध्या आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान आहे.

  साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक किंवा डोळ्यांना इजा पोहोचवितो. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभाेवती आणि चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे आणि हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे आढळलेल्या व्यक्तीने तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावे.