soldier kill wife

  • ड्युटीवरुन जवानाने पाणी पिण्याच्या कारण सांगुन घरी पळ काढला. घरी पोहचल्यावर गर्भवती पत्नीवर गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर जवानाने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि अत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे.

वर्धा – वर्ध्यातील पुलगावात जवानाने गर्भवती पत्नीवर गोळी झाडून स्वतःवरही गोळी  झाडल्याची घटना घडली आहे. या सैनिकाने कामवरुन पाणी पिण्याच्या कारणाने पळ काढला. घरी जाऊन गर्भवती पत्नीवर रायफलने गोळी झाडून तिला जागीच ठार केले. तर स्वतःवरही गोळी (soldier kill wife) झाडून आत्महत्या केली. 

गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीसांना कळवताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. मृत सैनिकाचे नाव अजय कुमार सिंह २५ तर गर्भवती पत्नीचे नाव प्रियंका कुमारी २६ आहे. दाप्तत्य हे मूळचे बिहार राज्याचे राहणारे आहेत. 

पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तर जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, पोलीस अधिक तपास करत आहे. असे पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.