धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करा

  • जिल्हाधिकारी मार्फत शासनाला निवेदन

वर्धा (Wardha). राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करीत सवलती देण्यात याव्यात, या मागणीकरिता धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने २५ सप्टेंबरला महात्मा गांधी पुतळयाजवळ आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्य शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाला अनुसूचित जातीत आरक्षण देत सवलती देण्यात यावा. समाजासाठी असलेली एक हजार कोटींची योजना थांबविण्यात आली आहे. ती लागू करण्यात यावी. शेळी पालन करणा-यांवर करण्यात येत असलेले हल्ले थांबविण्यात यावे. यासाठी कायदा करीत त्यांना शस्त्राचा परवाना देण्यात यावा. धनगर समाजाचे विद्यार्थी वसतीगृहापासून वंचित आहे. त्यांना याचा लाभ देण्यात यावा. त्यांच्यासाठी घोषित करण्यात आलेल्या योजनांवर अंमल करण्यात यावा. यांसह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर जितू गोरडे, अरुण लांबाडे, गजेंद्र कापडे, रामेश्वर लांडे, प्रा़ दीपक पुनसे, दिलीप उपासे, प्रशांत हुलके, कवडू बुरंगे, विलास निल, सतीश भोकरे, योगेश निखार, मनोज रोकडे, नरेंद्र ढवळे, संतोष महाजन, विनायक बन्नोरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.