मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन, मुंबईतील मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही, याकडेही वेधले लक्ष

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देवून आज फडणवीस यानी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात रोज ६५ हजाराच्यावर रुग्ण आढळत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी मागणी केली आहे.

    वर्धा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या खूप कमी असून ती तातडीने वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा केले आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून चाचण्याची संख्या वाढवण्याची मागणी केली होती.

    मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ नाही

    वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देवून आज फडणवीस यानी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात रोज ६५ हजाराच्यावर रुग्ण आढळत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी मागणी केली आहे. तसेच मुंबईतील मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे, असे ते म्हणाले.

    आयसीयू बेड्स वाढवा

    वर्ध्यात आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिनचा पुरवठा आणि मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाशी चर्चा करून आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली.