पवनारमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव,  क्षेत्र प्रतिबंधित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या पवनार परीक्षेत्रांमध्ये अखेर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला. या भागातील एक किलोमीटर परिसरातील क्षेत्रामध्ये पुढील तीन महिन्याकरिता मास खरेदी विक्रीवर बंदी घालण्याचेतसेच दहा किलोमीटरचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

वर्धा (Wardha). (संजय तिगावकर).  विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या पवनार परीक्षेत्रांमध्ये अखेर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला. या भागातील एक किलोमीटर परिसरातील क्षेत्रामध्ये पुढील तीन महिन्याकरिता मास खरेदी विक्रीवर बंदी घालण्याचेतसेच दहा किलोमीटरचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात अखेर बर्ड फ्ल्यू शिरकाव झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी याकरिता काल सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुनील केदार यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाचा कारभार आहे. वर्धा शहराच्या बाजूला असलेल्या विनोबा भावे यांच्या कर्मभूमी असलेल्या पवनार येथील हद्दीत बदक पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. या ठिकाणचा एक बदक मृत झाल्याने इतर बदकाचे सॅम्पल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथे पाठविण्यात आले होते.

या ठिकाणावरून संबंधित बदका मध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी तातडीने या परिसराच्या एक किलो मीटरच्या परिघामध्ये प्रतिबंधित क्षेत्र आणि 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश पारित केले.जिल्ह्यात अशा प्रकारचा आदेश पहिल्यांदाच निघाला आहे.

पवनार संक्रमित क्षेत्र
१. या गावाच्या एक किलोमीटर परीघामध्ये असणाऱ्या कुकुट पालन उद्योगातील कोंबड्या किंवा बदक नियमानुसार मारून टाकावे.
२. मृत पक्ष्यांचे नियमानुसार विलेवाट करावे.
३. परिसरातील पक्षी खाद्य, पक्षी खांद्याचे घटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट खुराडी सर्व विल्हेवाट लावावी.
४. संक्रमित क्षेत्रातील सर्व दुकाने स्वच्छ करावी, याठिकाणी पुढील तीन महिन्यापर्यंत विक्री करू नये असे सक्त निर्देश देण्यात आले आहे.
५. संक्रमित क्षेत्र म्हणून 10 किलोमीटरचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

बर्ड फ्लूच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केल्यानंतर या व्यवसायात मोठ्याप्रमाणावर निश्चित परिणाम होणार आहे. जिल्ह्यात या रोगाने शिरकाव केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

दहा किलोमीटरच्या परिसरात सर्वेक्षण
पवनार क्षेत्र वर्धा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच या संक्रमित क्षेत्रापासून दहा किलोमीटर परिसरामध्ये सर्वेक्षण होत असल्याने या क्षेत्रात कुक्कुटपालनाच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे.