प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सध्याच्या युगात सर्वत्र दिवसेंदिवस मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. बहुतांश घरात संवाद हरवत चालला आहे. दीड जीबी सारा गाव बी जी अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे.

  मयुर अवसरे
  विजयगोपाल (Vijay Gopal).  सध्याच्या युगात सर्वत्र दिवसेंदिवस मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. बहुतांश घरात संवाद हरवत चालला आहे. दीड जीबी सारा गाव बी जी अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे.

  मुले अल्पवयातच एक ना अनेक प्रकारच्या, व्यसनाकडे वळत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना पालक वर्गांना करावा लागत आहे. याकरिता जिल्हा तालुका स्तरावरून शाळांच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोबाईल व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्रे चालवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलात एकाकीपणा वाढत आहे. कारण अलीकडच्या काही वर्षात मोबाईल इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की त्याकडे कुणाचे ध्यान च गे ले नाही माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो. त्याला मोबाईल मधलं सगळं काही जमतं असे कौतुकाची थाप पालक वर्ग मारत होती. मात्र मुलं जसजशी त्यात गुरफटत गेली वास्तविक पालकांना भीती वाटायला लागली मुलं आता हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे असा प्रश्न पडला आहे.

  आईने मोबाईल हिसकावून घेतला मोबाईल विकत घेतला नाही, अशा कारणाने मुलं आत्महत्या करीत आहे यावरून मोबाईल इंटरनेटचे वेड कुठल्या थराला गेला आहे. याचा अंदाज येईल. वास्तविक गेल्या काही वर्षात सर्व प्रकारच्या व्यसनाबाबत पालक जागरूक नसल्याचे स्पष्ट आहे. अर्थात पालकाकडे वेळ नसल्याने किंवा त्यांच्या अतिशिक्षितपणाने, या सगळ्या गोष्टी घडत आहे. त्यामुळे सहाजिकच लहान मुलात व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बदलत्या काळात पालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने भावी पिढी अभ्यासू सदृढ व्यसनमुक्त करायची असेल तर काहीतरी पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

  जिल्हा व तालुकास्तरावर व्यसनमुक्ती केंद्र शासनाच्या वतीने चालवण्यात हवी आजकाल मुलांना आपल्या जीवनात काहीतरी करायचे आहे, काहीतरी बनायचे आहे असा आदर्श मिळेनासा झाला आहे. मोबाईल इंटरनेट बरोबरच दारू सारखे घातक व्यसन सुद्धा लागल्याचे चित्र उभे आहे. अशा व्यसनामुळे मुले रागीट संतापजनक होत असून आई बापाची तर सोडा शिक्षकांचे सुद्धा ऐकायला तयार नाही. शिक्षकाच्या अंगावर जाणारी पिढी तयार होत असल्याने शिक्षक सुद्धा मुलांना फारशी सांगत बसत नाही. कारण आता त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शासनाने देखील थोडी विकास कामे कमी झाली तरी चालेल.परंतू या पिढीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर याची फार मोठी किंमत मोजावी लागतील हे मात्र तेवढेच खरे!

  इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरु
  अलीकडेच पुण्यात आनंदवन इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रे सुरू झाल्याची माहिती आहे. हे राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र आहे या केंद्रात, व्यसनी मुलांची कलचाचणी घेऊन पालकांना पुढील पुढील धोक्याची सूचनाही दिली जाणार आहे.शिवाय साहित्यिक व मानसोपचार तज्ञ पालकांना मार्गदर्शन करणार आहे या केंद्रात मुलांचा बुद्ध्यांक विचार करण्याची क्षमता पद्धत व सामाजिक जाणीवही तपासली जाणार आहे. त्यानुसार पालकांना त्यांच्या मुलाचा व्यसनाचा कल कुण्या बाजूनी आहे. त्याचे दुष्परिणाम काय असतील याची माहिती देणार आहे.