प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  • कार्डधारकांची मागणी

कारंजा (घा) (Karanja Ghadge):  वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील सेलगाव लवणे येथील स्वस्त धान्य दुकानात धान्याची काळाबाजारी करण्यात येत आहे. दुकानदाराकडून लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वितरित केले जात नाही. याप्रकरणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबतीत वरिष्ठ अधिका-यांनी ८ ऑक्टोठबरला चौकशी केली; परंतु थातुरमातुर चौकशी करण्यात आल्याने दुकानाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कार्डधारक करीत आहे.

कारंजा घाडगे तालुक्याच्या सेलगाव लवणे येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा काळाबाजार करण्यात येत आहे. यामुळे कार्डधारकांनी तहसीलदाराकडे तक्रार करीत चौकशी करण्याची मागणी केली होते. त्यानुसार चौकशी करण्यात आली. थातूरमातूर परस्पर चौकशी केली, असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रारकर्त्यांना पूर्वसूचना देऊन पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. वरिष्ठ अधिका-यांनी परस्पर चौकशी केली. याप्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सेलगाव लवणे येथील नागरिकांनी केली आहे.

यावेळी मोरेश्वर पठाडे, सुनंद भुसारी,नत्थु खवशी, शुभांगी पठाडे, शालिकराम फरकाडे, राधिका हिंगवे, सुरेखा खवशी, रवी पठाडे, प्रदीप फरकाडे, पृथ्वीराज फरकाडे, रामदास फरकाडे, अमोल पठाडे, दिलीप गजाम, शंकर पठाडे, देवानंद गजाम, योगेश खवशी यांची उपस्थिती होती.