दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात युवा संघर्ष मोर्चाचे जागर आंदोलन

दहा दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाणा व देशभरातील शेतकरी नवीन कृषी विधेयक रद्द करण्यासाठी व हमी भावाचा कायदा बनविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनास समर्थन देण्यासाठी देवळी येथील इंदिरा गांधी चौक येथे गुरुदेव सेवा मंडळ व युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे समर्थनार्थ जागर आंदोलन करण्यात आले.

देवळी (Deoli). दहा दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाणा व देशभरातील शेतकरी नवीन कृषी विधेयक रद्द करण्यासाठी व हमी भावाचा कायदा बनविण्यासाठी आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनास समर्थन देण्यासाठी देवळी येथील इंदिरा गांधी चौक येथे गुरुदेव सेवा मंडळ व युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे समर्थनार्थ जागर आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने नुकतेन तीन कृषी विधेयक मंजूर केले. सदर कृषी विधेयक शेतकरी विरोधी आहे. यामुळे देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांचे आंदोलनास समर्थन देण्यासाठी युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी गीते व भजने गावून केंद्र सरकारला सद्बुद्धी यावी व शेतकरी विरोधी कायदे रद्द करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी जागर केला. रविवारी रात्री आठ वाजता देवळी तहसीलचे नायब तहसीलदार देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. रात्री दहा वाजेपर्यंत जागर आंदोलन सुरू होते. कार्यक्रमाच्या अखेरीस नीतेश कराळे यांनी या कायद्यातील जाचक अटी व नवीन कृषी विधयेक आपल्या वर्हाडी बोली भाषेत नागरिकांना समजावून सांगितले. त्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी गौतम पोपटकर, प्रवीण कात्रे, वैभव नगराळे, राम अंभुरे, गोपाल चोपडे, गौरव खोपाळ, अक्षय ठाकरे, मंगेश येसनखेडे, प्रवीण ठाकरे, संजीत देशमुख, सुरेश ठाकरे, प्रशांत चहारे, बळीराम वैद्य, बबलू राऊत, आतीश ढोक, अशोक पवार, गुरुदेव सेवा मंडळाचे विनोद भगत, महेश खाडे, तुषार खाडे, संतोष तिवसकर, संतोष तुरणकर, संतोष उगेमुगे, गौरव आकोटकर, अमोल शिखरे, नितीन लोखंडे, वाडी मामा यांची उपस्थिती होती.