बुल्डोजरच्या साहाय्याने अतिक्रमण तोडताना
बुल्डोजरच्या साहाय्याने अतिक्रमण तोडताना

हिंगणघाट (Hinganghat): वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या नांदगाव येथील एका गावक-याने घरासमोर वॉल कंपाऊंड उभे करून अतिक्रमण केले. अतिक्रमणामुळे स्त्याची रुंदी कमी झाल्याने बैलबंडी किंवा चारचाकी वाहन जात नसल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यासंबंधात ग्रामपंचायतच्या वतीने अतिक्रमण धारकास पत्र देऊन सदर अतिक्रमण त्वरित हटविण्याचे सांगितले; परंतु ग्रामपंचायत आदेशाला न जुमानता त्यांनी आपल्या अतिक्रमण कायम ठेवले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका प्रशासनाचे सहकार्याने हे अतिक्रमण हटविले.

तालुक्याच्या नांदगाव येथील वार्ड क्र. २ येथील रहिवासी रोशन जुमडे नामक इसमाने घरासमोर दोन्ही बाजुने अतिक्रमण केले. यामुळे गावक-यांना बैलगाडी व चारचाकी वाहने नेण्यास अडचण येत होती. गावक-यांनी या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केली. ग्रामपंचायत प्रशासनाने रोशन जुमडे यांना पत्र पाठवून अतिक्रमण हटविण्यास सांगितले. परंतु, त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्राला केराची टोपली दाखवित अतिक्रमण हटविले नाही. यामुळे नांदगाव ग्रामपंचायत प्रशासनाने नायब तहसीलदार विजय पवार यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्या आधारावर नायब तहसीलदार विजय पवार यांनी मंगळवारी नांदगाव येथे महसूल मंडळ अधिकारी अधिकारी प्रशांत निनावे, तलाठी ठाकरे, सरपंच नीलिमा पावले, उपसरपंच विठ्ठल कुबडे व दोन पुरुष व एक महिला पोलिस कर्मचा-यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी एक वाजता जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण तोडण्यात आले. मोठा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मार्ग मोकळा झाल्याने वार्ड क्रमांक 2 मधील गावक-यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले. ग्रामपंचायतीने गावातील सर्व वार्डातील नागरिकांना अशा प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आवाहन केले आहे.