जखमी मजूर
जखमी मजूर

वर्धा (Wardha) :  वंजारी चौक परिसरातील इंदिरा मार्केट समोर भाजी विक्रेत्यांनी दुकानापुढे हातगाडी उभी करण्यासाठी वाद घातला. भाजी विक्रेत्याने बॅटरी फेकून मारली. बॅटरी एका मजुराला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज 17 ऑक्टोंबर सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यानची आहे.

वर्धा (Wardha): वंजारी चौक परिसरातील इंदिरा मार्केट समोर भाजी विक्रेत्यांनी दुकानापुढे हातगाडी उभी करण्यासाठी वाद घातला. भाजी विक्रेत्याने बॅटरी फेकून मारली. बॅटरी एका मजुराला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज 17 ऑक्टोंबर सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यानची आहे.

लॉकडाऊन काळात भाजी बाजार बंद असल्यामुळे भाजी विक्रेते दररोज वंजारी चौकातील इंदिरा मार्केट समोर भाजीचे दुकान मांडतात. एका भाजी विक्रेत्यांनी दिनेश चुन्ने यांच्या दुकानासमोर हात गाडी लावली. चुन्ने यांनी केला गाडी बाजूला लावायला सांगितली यामुळे दोघात वाद झाला अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला.परंतु भाजीवाल्याने त्याच्याजवळची बॅटरी फेकून मारली. बॅटरी चुन्ने यांना न लागता तिथे उपस्थित असलेले मजूर देवराव गोटे यांच्या डोक्याला लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यांच्या डोक्याला चार टाके सुद्धा लावण्यात आले. रामनगर पोलिसात याबाबत तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.