प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वर्धा (Wardha). दिवसाढवळया घरात चोरी करुन लॉकरमधून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये रोख रक्कम तसेच अडीच लाखांच्या दागिने लंपास केले. ही घटना वर्धा शहरातील प्रतापनगर येथे रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रामनगर पोलिसांनी तीन महिला संशयित चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

  • वर्धेतील रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत दागिन्यांची चोरी

वर्धा (Wardha). दिवसाढवळया घरात चोरी करुन लॉकरमधून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये रोख रक्कम तसेच अडीच लाखांच्या दागिने लंपास केले. ही घटना वर्धा शहरातील प्रतापनगर येथे रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रामनगर पोलिसांनी तीन महिला संशयित चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

रिना अलोक अने (३९) यांच्याकडे नेहमीप्रमाणे घरात काही सदस्य उपस्थित होते. तर काहीजण कामाकरिता बाहेर गेले होते. दिवसभरामध्ये काही अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन नियोजित ठिकाणी ठेवलेली चावी घेऊन लॉकर उघडले. यामधून २५ ग्रॅम सोन्याचे ५० हजार किंमतीचे नॅकलेश नॅकलेश, २० ग्रॅमचे दुसरे नॅकलेश किंमत ४० हजार , १७ ग्रॅम सोन्याची ३४ हजार रुपये किंमतीची लॉकेटची साखळी, २५ ग्रॅमचा ५० हजारांचा सोन्याचा हार ,सोन्याची साखळी, अंगुठी असा एकूण ९६ ग्रॅम सोन्याचे अलंकार किंमत २ लाख तसेच नगदी ५५ हजार असा एकूण अडीच लाखाच्या मालावर हात साफ केला.

त्यानंतर चोरांनी लॉकर पुन्हा जसेच्या तसे बंद करुन ठेवले. जेव्हा रीना घरी आली तेव्हा तिला नेहमीच्या ठिकाणी ठेवलेली चावी दिसून आली नाही. तिने याबाबत विचारणा केली. त्यानंतर चावी दुस-याच जागेवर मिळाली यावरुन चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत रामनगर पोलिस घटनास्थळी पोहचले. घटना स्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तीन संशयित महिलेंविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.