हल्ल्यात जखमी झालेले दिनेश इटनकर
हल्ल्यात जखमी झालेले दिनेश इटनकर

तालुक्यातील मेंढुला येथील ग्रामपंचायतच्या महिला सदस्यावर युवकाने स्क्रु-ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. या प्रकरणी दिनेश इटनकर यांचे तक्रारीवरून आरोपी प्रतीक वरघने यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. 

समुद्रपूर (Samudrapur). वर्धा जिल्ह्यातील तालुक्यातील मेंढुला येथील ग्रामपंचायतच्या महिला सदस्यावर युवकाने स्क्रु-ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. या प्रकरणी दिनेश इटनकर यांचे तक्रारीवरून आरोपी प्रतीक वरघने यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.

मेंढूला ग्रामपंचायतच्या सदस्याचा पती दिनेश इटनकर रस्त्याने जात असताना आरोपी प्रतीक वरघने याने गावातील विविध कामे झाले नाही. यावरून त्याचे सोबत वाद घातला. जवळ असलेल्या स्क्रुड्रायव्हरने डोक्यावर वार करून जखमी केले. जखमी इटनकर यांचेवर समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी दिनेश इटनकर यांचे तक्रारीवरून प्रतिक वरघने याचेवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेसंदर्भात समुद्रपुरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिक तपास करीत आहे.