पालिका, महसूल आणि पोलिस विभागाने कोरोना बाधितांवर लक्ष ठेवावे; कोरेाना संदर्भात आढावा बैठक

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पहाता जिल्हयातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याचे अनुषंगाने येथील नगरपालिका सभागृहात कोविड-19 संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

    देवळी (Deoli).  कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पहाता जिल्हयातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याचे अनुषंगाने येथील नगरपालिका सभागृहात कोविड-19 संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालिका, महसुल व पोलिस विभागाने इतर जिल्हयातुन येणा-यांवर लक्ष देत जिल्हयातून आलेल्यांवर करडी नजर ठेवावी, प्रत्येक ठिकाणी लसीकरणावर भर द्यावा, अशा सुचना खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या.

    यावेळी तहसीलदार राजेश सरवदे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, मुख्याधिकारी विजय देवळीकर, पोलिस निरिक्षक तिरुपती राणे, ग्रामण रुग्णालय अधिक्षक आशिष लोंडे, बिडीओ राऊत, न.प.उपाध्यक्ष प्रा.नरेंद्र मदनकर आदि उपस्थित होते. देवळीच्या कोविड केअर केंद्रामध्ये ऑक्सीजन खाटांसह डॉक्टर व इतर स्टॉपची व्यवस्था करावी, अशा सुचना खासदार तडस यांनी दिल्या. तहसीलदार सरवदे यांनी कोविड केंद्रासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर स्टॉपची कमतरता असल्याचे सांगितले. सध्या देवळी तालुक्यातील 800 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर 16 निगराणी पथकाव्दारे न लक्ष ठेवले जात आहे.

    लसीकरणासाठी तालुक्यात 16 केंद्र कार्यान्वित असुन आतापर्यंत 23 हजार 408 लोकांचे लसीकरण करण्यात आले. असे तहसिलदार सरवदे यांनी सांगितले. आढावाला बैठकीला नगर परिषद अधिक्षक ज्ञानेश्वर शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त कोरोना बाधितांना कॉरंटाईन करावे, -19 महामारी नियंत्रणात आणायची असेल तर सर्व अधिका-यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. असे खासदार तडस म्हणाले.