मेहुण्याने केली जावयाची हत्या; आरोपी ताब्यात

कौटुंबिक वादातून रागाच्या भरात मेहुण्याने चाकुने वार करुन जावयाची निघृण हत्या केली. ही घटना शहरातील पुलफैल परिसरात दुपारी 2.30 वाजता घडली. घटनेबाबत माहिती होताच सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे.

    वर्धा (Wardha). कौटुंबिक वादातून रागाच्या भरात मेहुण्याने चाकुने वार करुन जावयाची निघृण हत्या केली. ही घटना शहरातील पुलफैल परिसरात दुपारी 2.30 वाजता घडली. घटनेबाबत माहिती होताच सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे.

    माहितीनुसार,  पुलफैल येथील आरोपी अजय भूरे (21) च्या बहिणीला मृतक अमीत रत्नाकर निमसडे (28) याने आठ वर्षापुर्वी पळवुन नेले होते. दोघांनी विवाह करुन परिसरातच रहात होते. यामध्ये त्यांना दोन मुली व एक मुलगा झाला. परंतु मागील दिड महिन्यांपासुन पति पत्नी मध्ये वाद होत असल्याने अजयची बहीण त्याच्या घरी रहायला आली होती.अशातच रविवारी दुपारी 2.30 वाजता अजय हा अमीतच्या घरी गेला. तेथे या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात अजय ने अमीतवर चाकुने वार केले. यामध्ये अमीतचा जागीच मृत्यू झाला.

    माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनची चमु घटनास्थळी पोहचली.पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट देत योग्य सुचना दिल्या. वृत्त लिहेस्तोवर पोलिसांनी आरोपी अजय भुरे याला ताब्यात घेतले नव्हते. पुढील तपास एपीआय किन्नाके करीत आहे.