प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वर्धा. अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोनेगाव स्टेशन शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे वयजवळपास ४० वर्ष आहे. त्याची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

शेतकरी महाजन यांच्या शेतालगत अज्ञात इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी जाऊन पाहणी केली असता अज्ञात ईसमाचा मृतदेह आढळून आला. त्याचे मानेवर जखमा दिसून येत होत्या. त्याची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार योगेश कामाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. दगडाचे चेहरा ठेचल्याने विद्रुप झाला आहे. इसमाची ओळख अद्यापही पटली नाही. पुढील तपास ठाणेदार योगेश कामाले करीत आहे.