‘नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये’ प्रविण तोगडिया यांनी व्यक्त केली खंत

"मी आतापर्यंत देशात २० हजारांहून अधिक रॅल्या केल्या आहेत. त्याचा फायदा भाजपला मिळाला. त्यामुळे बिजेपी सत्तेत आली. परंतु आता मी कोणत्याही पक्षाचा मजूर नाही.” असं प्रविण तोगडिया यांनी म्हटलं आहे.

    ‘नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये’ अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे जिवलग मित्र प्रविण तोगडिया यांनी व्यक्त केली आहे. ते वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं आयोजीत करण्यात आलेल्या कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी पंतप्रधान मोदी सध्या आपल्याला भेटत नसल्याची खंत व्यक्त केली.

    यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना तोगडीया म्हणाले की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाचा मजूर नाही, मी हिंदुसाठीच कार्य करणार. आम्ही संघटन विचार या माध्यमातुन समोर चाललो असून मी आतापर्यंत देशात २० हजार पेक्षा जास्त रॅल्या केल्या. त्याचा फायदा भाजपला मिळाला. त्यामुळे बिजेपी सत्तेत आली. परंतु आता मी कोणत्याही पक्षाचा मजूर नाही.”

    खासगीकरणावरुन केंद्र सरकारवर टीका

    “साधा विचार करा सरकार जेव्हा रेल्वेकडून 100 रुपये कमवायचं तेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपये होतं. आता खासगीकरणातून सरकार रेल्वेकडून 200 रुपये कमवणार आहे. पण, कोणताही व्यापारी हा तेव्हाच तुम्हाला 200 रुपये देइल जेव्हा तो 500 रुपये कमवत असेल. आणि ते 500 तेव्हा कमवतील जेव्हा प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये असेल. याचा अर्थ भविष्यात सामान्यांचा खर्च पाच पटीने वाढणार आहे.” असं तोगडिया यांनी म्हटलं आहे.