प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कारंजा (घा) (Karanja Ghadge): तालुक्यातील ठाणेगाव येथील ग्रामदेवता असलेलीजगदंबा माता भाविकांचे श्रध्दास्थान आहे. भक्तांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान असल्याची सर्वदूर ख्याती आहे. यावर्षी भाविकांनी 224 घटाची सामूहिक स्थापना करुन दिप प्रज्वलीत करण्यात आले.

  • २२४ घाटांची स्थापना करुन दीप प्रज्वलन

कारंजा (घा) (Karanja Ghadge): तालुक्यातील ठाणेगाव येथील ग्रामदेवता असलेलीजगदंबा माता भाविकांचे श्रध्दास्थान आहे. भक्तांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान असल्याची सर्वदूर ख्याती आहे. यावर्षी भाविकांनी 224 घटाची सामूहिक स्थापना करुन दिप प्रज्वलीत करण्यात आले.

दोन द्वारपाल असलेले मंदिर तेराव्या शतकात बांधले असल्याचे सांगितले जाते. हेमाडपंथी पद्धतीने दगडाच्या सहाय्याने कोरीव काम करून बांधले आहे. पार्वती मातेने चंड मुंड या राक्षसांचा वध करून मातेने येथे ठान मांडले म्हणून या गावाला ठाणेगाव असे नाव पडले असल्याचे म्हटले जाते. या मंदिरात मूर्ती ही स्वयंभू आहे व समोरच पिंड आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर वाघाची दगडी मूर्ती आहे. आत मध्ये शिरताच पुरातन पद्धतीने दगडी खांब असलेला सभामंडप आहे. गाभारा खोल असला तरी दुरूनच जगदंबा मातेचे दर्शन होते. दोन मुकुट असलेली समोरील मुकुट हे सिंहाचे व त्यावर जगदंबा माता स्वार आहे.

ऐतिहासिक कथा अशी की, काटोल येथील चंडिका माता, ठाणेगाव येथील जगदंबा माता व येनगाव येथे जल देवी माता हे तीन हि मंदिर एकाच रात्री बांधण्यात आले होते, दिवस उजाडताच फक्त येनगाव येथील मंदिर अर्धवट राहिले होते. त्यामुळे मंदिराची प्रचिती परिसरात आहे. नागपूर ,काटोल, वर्धा, कारंजा येथील भाविक दर्शनाकरिता येतात.वर्षभरात चैत्र व शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात होतो, कार्तिक महिन्यात काकड आरती आणि पूजा पाठ चालतो व पौर्णिमेला भंडारा होतो; परंतु यावर्षी कोरोनाच्या विश्व महामारीमुळे मंदिराच्या मुख्य द्वारावर जवळ सनी टाइज मशीन लावण्यात आलेली आहे. गाभार्याचे मुख्य द्वार बंद असल्यामुळे भाविक तिथेच दर्शन घेतात. दरवर्षी चहा व नाश्ताचे वाटप करण्यात येते. परंतू कोरोणामुळे यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे.