प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा (Wardha) (संजय तिगावकर) : सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या खेळात मोठ्या शहरातील लाईफस्टाईल च्या आकर्षणाने इझी मनीच्या लोभात नव श्रीमंतांच्या मुलांना वाईट सवय लागल्याने कुटुंब आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याची माहिती नवराष्ट्रला प्राप्त झाली आहे.

वर्धा (Wardha) (संजय तिगावकर) : सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या खेळात मोठ्या शहरातील लाईफस्टाईल च्या आकर्षणाने इझी मनीच्या लोभात नव श्रीमंतांच्या मुलांना वाईट सवय लागल्याने कुटुंब आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याची माहिती नवराष्ट्रला प्राप्त झाली आहे.

जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे , नागपूर,मुंबई ,पुणे शहरातील लाइफस्टाइलचे आकर्षण नवश्रीमंतांच्या मुलांना लागले आहे. लाइफस्टाइल अंगीकारण्याकरिता मित्रांसोबत जाणे.या लाइफस्टाइल साठी सहज पैसा प्राप्त करण्याच्या लोभापाई क्रिकेटची बेटींग, मोबाईल वरूनच सट्टा लावणे, ताबडतोब मिळणारा पैसा, टीव्हीवर किंवा मोबाईलवर आयपीएल क्रिकेटच्या मॅच पाहताना मित्रांसमोर क्रिकेटची बेटिंग लावणे, आणि लाखो रुपये मिळाले की त्याचा अप्रूप असण्याचा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे. याकरिता सुरुवातीला घरातून लहान चोऱ्या करून पैसा आणायचा तो इकडे बेटिंगवर लावायचा. नंतर मग सावकारांकडून लाखो रुपयांची उचल करायची, सावकाराने वसुलीचा तगादा लावला की कुटुंब प्रमुखाला सांगून मोकळे व्हायचे, यामुळे संपूर्ण कुटुंब विवंचनेत टाकायचे, असा कल सध्या या नवश्रीमंताच्या कुटुंबात सुरू आहे.

सध्या सर्वच व्यवसाय डबघाईस आले आहे.कुटुंब प्रमुखाने नकार दिला तर मृत्यूला जवळ करण्याचे प्रताप वर्धा व हिंगणघाट येथे आढळून आले. नुकत्याच सुरू असलेल्या आयपीएल मध्ये काही कुटुंब अडकले आहेत. यात वर्धा शहरातील प्रसिद्ध मिठाई वाले, बिल्डर, पोद्दार बगीचा, दयाल नगर, मुख्यबाजारातील काही नवश्रीमंत कुटुंबाला या दिवट्या चिरंजीवांनी लयास नेले आहे. पालकांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यायला काही हरकत नाही. आज आपल्या मुलासोबत जो प्रकार घडला तो इतरांसोबत घडू नये यासाठी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

पालकांकडून मुलांच्या इच्छांची जपणूक

जे आपल्या आयुष्यामध्ये उपभोगले नाही ते मुलाला कसा देऊ शकतो यासाठीची धडपड पालक सुरुवातीपासून करतो. या सवयीने मुलांमध्ये भावनिक परिपक्वता येत नसल्यानेच चुकीचा मार्ग अवलंबितात. मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे.
— डॉ. के. पी. निंबाळकर, मानसोपचार तज्ञ, वर्धा

कोणत्याही मोहाला बळी पडू नका
हा सर्व प्रकार बेकायदेशीर आहे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे कोणत्याही मोहाला बळी पडू नका.जर तुम्हाला कोणी मानसिक दृष्ट्या त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार देऊ शकता.
–पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा.