भाजप कार्यालयात नवनियुक्त भाजप नेत्याचा सत्कार सोहळा, गुन्हा दाखल

वर्धा –  कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. वर्ध्यात लॉकडाऊन आणि जमावबंदिचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु वर्ध्यातील भाजप कार्यालयात नवनियुक्त भाजप नेत्याचा सत्कार सोहळा आणि समारंभ भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महागात पडलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यालयात नव्याने जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत राजेश बकाने यांची सचिवपदी निवड झाली. त्यामुळे राजेश बकाने यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला होता. परंतु या सोहळ्याची माहिती येथील तहसीलदार मिळताच त्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानंतर रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाताच कार्यक्रम सुरू असल्याच निदर्शनास आलं होतं. तसेच पोलिसांनी कार्यक्रम बंद करून भाजपाचे ३५ ते ४० कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.