निर्मल बेकारीच्या कारखान्याला लागलेल्या आगीचे दृष्य (वर्धा)
निर्मल बेकारीच्या कारखान्याला लागलेल्या आगीचे दृष्य (वर्धा)

  • बेकारी मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान

वर्धा (Wardha).  शहरातील भामटीपूरा परिसरात असलेल्या निर्मल बेकरीच्या कारखान्याला शुक्रवारी रात्री आग लागली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशामक विभाग व नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत मशीन जळाल्याची माहिती आहे.

निर्मल बेकरीचा भामटीपूरा चौकाजवळ कारखाना आहे. शुक्रवार असल्याने काम बंद होते. रात्री जवळपास ८.३० वाजताचे दरम्यान अचानक आग लागली; परंतु बराच वेळ याची माहिती नागरिकांना मिळाली नाही. रात्री ९.४५ वाजताचे दरम्यान कारखान्यातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी कारखान्याचे मालक, पोलिस व अग्निशामक विभागाला माहिती दिली. नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

काही युवकांनी समयसूचकता दाखवित इलेक्ट्रीक सर्कीट बंद केले. पाण्याचा मारा सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केले. अग्निशामक विभागाचे वाहन आल्यानंतर आग नियंत्रणात आली. आगीत मशीन जळाल्याची माहिती आहे. शॉर्टसर्कीटने आग लागल्याची माहिती आहे.