प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहर परिसरात राहणा-या सत्तर वर्षीय वृध्दाने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना 10 डिसेंबर रोजी उघडकीस आली. ही घटना दहा ते बारा दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे.

आष्टी शहीद (Ashti Shahid ).  शहर परिसरात राहणा-या सत्तर वर्षीय वृध्दाने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना 10 डिसेंबर रोजी उघडकीस आली. ही घटना दहा ते बारा दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे.

माहिती नुसार शब्बीर शहा महमुद शहा (70) हा कुलूप व छत्री दुरस्त करण्याचे काम करतो. त्याचे शेजारी राहणा- या दांम्पत्याशी कडाक्याचे भांडण झाले होते. दरम्यान पीडित मुलीचे गालावर चापटा मारल्या होत्या. यावेळी शेजारी राहणा-यांनी मध्यस्ती केल्याने भांडण मिटले. तेव्हापासून दोनही कुटुंबात तेढ निर्माण झाले होते. यातच 9 डिसेंबरला दुपारी 4 वाजताचे दरम्यान घडली. यावेळी मुलीने काही दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली. पीडितेचे वडिलांनी पोलिस ठाणे गाठुन तक्रार केली. पोलिसांनी आरोपीचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती मिळताच आरोपी शब्बीर शहा फरार झाला होता. त्यास बोरखेडी येथुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.