The second wave of corona in the country

कोरोना बाधित आढळलेल्या ५३ रूग्णांमध्ये २७ पुरूष व २६ महिलांचा समावेश आहे.

वर्धा: जिल्ह्यात गुरूवारी प्राप्त अहवालापैकी ५३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये वर्धा २५, देवळी१६, समुद्रपूर २, हिंगणघाट येथील २ रूग्णांचा समावेश आहे. सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा येथे कोरोना आजाराचा एकही रूग्ण आढळला नाही. कोरोना बाधित आढळलेल्या ५३ रूग्णांमध्ये २७ पुरूष व २६ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह रुग्ण ३८५ असून सात हजार १७४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.