प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वेगात असलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू झाला. तर, दुसरा किरकोळरित्या जखमी झाला. ही घटना वडनेर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या दारोडा टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर घडला. शेषराव भोयर असे मृतकाचे नाव आहे. 

वर्धा (Wardha).  वेगात असलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार इसमाचा मृत्यू झाला. तर, दुसरा किरकोळरित्या जखमी झाला. ही घटना वडनेर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या दारोडा टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर अलीकडेच घडली. शेषराव भोयर असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार भास्कर शामराव मोरे व शेषराव भोयर एमएच २९ एई ३१११ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरकडे जात होते. शुक्रवारी रात्रीचे दरम्यान मागुन येत असलेल्या ट्रकने दुचाकीस धडक दिली.यात दोघेही खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या शेषराव भोयर यांना जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वडनेर पोलिस घटनास्थळी पोहोचली.

भास्कर मोरे यांना रूग्णालयात पाठविण्यात आले. तर मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता रूग्णालयात पाठविण्यात आला. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहे.