hinganghat

हिंगणघाट. शहरातील वाढते कोरोना संक्रमन पाहता समाजसेवकांनी आणि व्यापा-यांनी येत्या २५ तारखेपासून एक आठवडयाच्या स्वयंघोषित कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. आमदार समीर कुणावार यांनी सर्वाना विश्वासात घेऊन जनसंचार बंदीला पाठींबा दिला. परंतु, काही संघटना तसेच व्यकतींनी कर्फ्यूला विरोध दर्शविला आहे.

काही विघ्नसंतोषी व्यक्ति त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट शहरात आतापर्यंत ६५० लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे. मोठ्या प्रमाणात संसर्ग थांबविण्याची आज काळाची गरज असतांना काही विघ्नसंतोषी या जनता कर्फ्यूचा विरोध करीत आहेत. काही स्वयंभु नेत्यांकडून याला विरोध केला जात असून सामान्य जनता मात्र विघ्नसंतोषी लोकांचा सर्वत्र विरोध करतांना दिसून येत आहे.