५५ लाख द्या, अन्यथा बँक उडविण्याची धमकी; एमआयडीसीच्या सेंट्रल बँक आँफ इंडिया शाखेतील घटना

सुसाईड बॉम्बर (suicide bomber) म्हणून बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या माथेफिरू व्यक्तीने बँक व्यवस्थापकाला (the bank manager) 55 लाख रुपये देण्याची मागणी करत बँक उडविण्याची धमकी (bomber threatened to blow up the bank) दिली. ही घटना एमआयडीसी (MIDC) येथील सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या शाखेत शुक्रवार 4 जून रोजी दुपारी घडली.

    वर्धा (Wardha).  सुसाईड बॉम्बर (suicide bomber) म्हणून बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या माथेफिरू व्यक्तीने बँक व्यवस्थापकाला (the bank manager) 55 लाख रुपये देण्याची मागणी करत बँक उडविण्याची धमकी (bomber threatened to blow up the bank) दिली. ही घटना एमआयडीसी (MIDC) येथील सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या शाखेत शुक्रवार 4 जून रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे कर्मचा-यांत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी (Sevagram police) माथेफिरू व्यक्तीला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बैचलर रोडवरील सानेगुरुजी नगर येथील योगेश प्रकाशराव कुबडे (वय ४२) नावाचा व्यक्ती शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता एमआयडीसी येथील सेंट्रल बँक आँफ इंडियाच्या शाखेत आला. त्यानंतर तो सेवकासबोत शाखा व्यवस्थापक चेतना खोब्रागडे (वय 33) यांच्या कक्षात गेला. तेथे त्याने एक कागद व्यवस्थापक खोब्रागडे यांच्या हातात दिला. त्याने सुसाईड बॉम्बर असल्याचे सांगत 15 मिनिटाच्या आत मला 55 लाख रुपये दिले नाही, तर बँक उडविण्यात येईल सांगितले.

    तुम्हाला जीवंत राहायचे असेल तर मी सांगतो ते ऐकण्याची धमकी दिली. त्यानंतर बँक व्यवस्थापकाने सेवाग्राम ठाण्यात कार्यरत असलेल्या ओळखीच्या पोलिस कर्मचारी महिलेला कर्जाच्या निमित्ताने बँकेत येण्याचे सांगितले. पोलिस कर्मचारी बँकेत आल्याचे बघितल्यावर सदर व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी योगेश प्रकाशराव कुबडे (वय 42) याच्याविरुद्ध सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    बॉम्बसदृष्य साहित्यासह चाकू, एअर पिस्टल जप्त
    पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कमरेला गुंडाळलेले बनावट बॉम्बसदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केला आहे. सहा लालसर रंगाच्या पाईपच्या कांड्या, छोटे डिजीटल वॉच, जोडलेली बॉम्बसदृश्य वायर जप्त केले. सदर आरोपीने पिस्तूल ऑनलाईन मागवल्याचे पोलिस तापसात पुढे आले आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्या योगेश कुबडे यास अटक केली. आरोपीचा सायबर कॅफे असून कर्जाची परतफेड करण्यासाठी नैराश्यातून हा प्रकार केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

    बॉम्ब ऍक्टिव्ह केलायं
    सेवाग्राम पोलिस ठाण्यासमोर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तोंडाला कापड गुंडाळून एक व्यक्ती आला. त्याने बँक शिपायाच्या डोक्याला एअर पिस्तूल लावून पैशांची मागणी करून टेरेसवरून त्याला खाली घेऊन आला. त्यानंतर पिस्तूल लपवून शिपायाच्या हातात पत्र दिलं. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिले. बँकेच्या व्यवस्थापकाला त्यातील मजकूर वाचून धक्काच बसला. मला आजारावर उपचारासाठी 55 लाख रुपयांची गरज असून मी सुसाईड बॉम्बर असून बँकेत येताच बॉम्ब ऍक्टिव्ह केलाय. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नये, अन्यथा सर्वांना 15 मिनिटात उडवून देईल, अशी धमकी दिली.

    असे लिहिले पत्र
    प्रिय बँक कर्मचारी,
    पूर्ण पत्र वाचल्यानंतरच विचार करुन निर्णय घ्या, ही विनंती आहे. माझ्याजवळ गमावण्यासारखं असं काहीच नाही. मी एका गंभीर आजाराने पीडित आहे. मला उपचारासाठी 55 लाख रुपयांची आवश्यकता आहे. मी जर इतक्या पैशांचा बंदोबस्त करु शकलो नाही तर पुढच्या 45 ते 60 दिवसांत माझा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे मी सुसाईड बॉम्बर बनवला आहे. मी बँकेत येताच या बॉम्बला सुरु केलं आहे. आता तुमच्याकडे आणि माझ्याजवळ फक्त 15 मिनिटांचा वेळ असून तो आपल्यासाठी भरपूर आहे. जर कुणी हुशारी करुन सेक्युरिटी अलार्म वाजवण्याचा किंवा पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्या आयुष्यातील शेवटची चूक असेल. मी निर्णय घेण्यासाठी एका सेकंदाचा देखील विचार करणार नाही.

    तुमच्याजवळ दोनच मार्ग आहेत. पहिला म्हणजे पोलिसांना बोलावलं तर स्टाफ आणि मी आपल्या दोघांपैकी कुणीही वाचणार नाही. दुसरा मार्ग म्हणजे मला 55 लाख रुपये नगदी पैसे द्या. माझं काम होईल आणि मी चालला जाईल. असंही मला यातना सोसतच मरायचं आहे. मी मरेन पण तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन मरेन. मी असंही मरणारच आहे. मला काही फरक पडत नाही. तुम्हाला जर रात्री कुटुंबासोबत जेवायच असेल तर मी सांगतो तसं करा. मला 55 लाख रुपये रोख द्या. तुमच्या सगळ्यांचा जीव मौल्यवान आहे. मी कुणालाही नुकसान पोहोचवणार नाही. तुमच्या पूर्ण स्टाफला समजावून द्या. हाच एकमेव मार्ग आहे. तुम्ही आणी मी सुटू. धन्यवाद !”