नेरी पूनर्वसन येथे १५ दिवसांपासून पाईटंचाई; ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट

वर्धा तालुक्यातील नेरी पुनर्वसन व पिपरी पूनर्वसन येथील सरपंच कोरोनाबाधित असल्यामुळे मागील 15 दिवसांपासून गावाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

    वर्धा (Wardha).  तालुक्यातील नेरी पुनर्वसन व पिपरी पूनर्वसन येथील सरपंच कोरोनाबाधित असल्यामुळे मागील 15 दिवसांपासून गावाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

    येथील सरपंच कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने 15 दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला नाही. काही बहुतांश जणांनी पाणीपट्टी व मालमत्ता कर भरला नसल्याने ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ आली आहे.

    ऐन उन्हाच्या कडाक्यात नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गावकऱ्यांना जारचे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.