कारंजा ते गंवडी रस्त्याची दुरवस्था; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत झाले होते रस्त्याचे काम

कारंजा ते गवंडी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. याकडे संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष होत आहे. दिड वर्षापुर्वी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते. रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

कारंजा (घाडगे) (Karanja Ghadge).  कारंजा ते गवंडी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. याकडे संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष होत आहे. दिड वर्षापुर्वी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते. रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

कारंजा शहरापासून जात असून या मध्ये अनेक गावे जोडली गेली आहे. हा रस्ता मुख्य रहदारीचा आहे. परंतु रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे.चालकाला खड्डा चुकविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता दीड वर्षापूर्वी या रोडचे बांधकाम कंपनीने केले आहे. रस्ता दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षापर्यंत कंत्राटदाराची असते. परंतु रस्त्यावर खड्डे पडुनही रस्त्याची दुरुस्ती केल्या जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे. या रस्त्याची त्वरील दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी नागरिक करीत आहे.

रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष
कारंजा ते गंवडी रस्ता जिल्हापरिषद अध्यक्ष यांच्या मतदार क्षेत्रात आहे. मात्र तरीही या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा बोलत आहे. लवकरात लवकर अध्यक्षानी लक्ष देण्याची मागणी होत आहे.