ग्रामीण भागात वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा ; नागरिकांमध्ये संताप

वीज वितरण कंपनीव्दारे कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    हिंगणघाट (Hinganghat).  वीज वितरण कंपनीव्दारे कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    वडनेर येथे वीज वितरण कार्यालयातंर्गत ग्राहकांकडे असलेल्या थकीत वीजबिलाची वसुली करण्यात येत आहे. ग्राहकाला दर महिन्याला वीज बिल देण्यात येते. बिलामध्ये स्थिर आकार, वीज आकार तसेच वीज शुल्क लावून वीज बिल देण्यात येत आहे. वीज बिल अव्वाच्या सव्वा येत असल्याने ग्राहकांना ते भरणे कठीण जात आहे. याचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतर कर न लावता वापर केलेल्या युनिटच्या आधारावर ग्राहकाला बील देण्याची मागणी नागरिक करीत आहे. यामुळे नागरिकांना वीज बिल भरणे सहज शक्य होईल. परिणामी वीज पुरवठा खंडित न करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.