प्राध्यापक अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ निकेश नगराळे
प्राध्यापक अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ निकेश नगराळे

जळीत हत्याकांड प्रकरणातील न्यायालयातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी आरोपीचे वकील गैरहजर असल्याने सरकारतर्फे आरोपीच्या विरोधात आरोप निश्चित करता आले नाही. दोन दिवसानंतर १७ डिसेंबरला न्यायालयासमोर आरोप प्रस्तावित करण्यात येणार आहे.

हिंगणघाट (Hinganghat). जळीत हत्याकांड प्रकरणातील न्यायालयातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी आरोपीचे वकील गैरहजर असल्याने सरकारतर्फे आरोपीच्या विरोधात आरोप निश्चित करता आले नाही. दोन दिवसानंतर १७ डिसेंबरला न्यायालयासमोर आरोप प्रस्तावित करण्यात येणार आहे.

३ फेब्रुवारी २०२० ला झालेल्या जळीत हत्याकांड याबाबत जिल्हासत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांचे न्यायालयासमोर सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली होती. पोलिसांनी आरोपी विकी उर्फ निकेश नगराळे याला न्यायालयासमोर हजर सुद्धा केले होते. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम सुद्धा न्यायालयामध्ये उपस्थित झाले. उज्वल निकम यांनी न्यायालयासमोर आरोपी विकी याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयापुढे प्रस्ताव ठेवला होता. परंतु, आरोपीचे वकील गैरहजर असल्याने न्यायालयाने दोन दिवसानंतर 17 डिसेंबरला उपस्थित होण्याचे आदेश दिले. त्यामुळे आरोप निश्चित करता आले नाही. 10 महिन्यांपूर्वी प्रा. अंकिता पिसुड्डे त्यांच्यावर आरोपी विकी याने पेट्रोल टाकल्याने त्यांचा सात दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याबाबतचा खटला आज न्यायालयांमध्ये सुरू होणार होता.

न्यायालयापुढे बघ्यांची गर्दी
फेब्रुवारीमध्ये ही घटना घडल्यानंतर दहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीसुद्धा आज शहरातील नागरिकांनी न्यायालयापुढे गर्दी केली होती. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना बघण्याकरिता तसेच आरोपी विक्की याचे करीता सुद्धा नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला. Adv. उज्वल निकम यांना झेड सिक्युरिटी असल्यामुळे त्यांच्या सभोवताली सिक्युरिटीचा घेरा सतत सोबत होता.

प्रत्यक्ष सुनावणीला पंधरा दिवसानंतर सुरुवात
17 डिसेंबरला आरोप निश्चित झाल्यावर पंधरा दिवसानंतर खटल्याच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.याबाबत माननीय न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे ही विनंती न्यायालयाने मान्य सुद्धा केली. खटल्यातील प्रत्यक्ष पुराव्याची साक्षीदारांची सुनावणीकरीत कामकाज येत्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात सुरू होईल. कोवीडमुळे खटल्याची सुरुवात उशिरा होत आहे. सरकारच्या वतीने आम्ही या खटल्याची सुनावणी जलद रितीने घेण्यासाठी आम्ही निश्चित प्रामाणिक प्रयत्न करू असे विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी माध्यमांची चर्चा करताना सांगितले.

‘शक्ती’ कायद्याने महिलांचे सबलीकरण
आज विधानसभेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे. हे विधेयक संमत झाल्यानंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. यावर मंजुरी मिळाल्यानंतर महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय उपयुक्त असा कायदा तयार होईल. शक्ती कायद्याने महिलांचे सबलीकरण होईल. महाराष्ट्र सरकारने एक क्रांतीकारक पाऊल उचलले आहेत. या कायद्यामध्ये विशेषतः बलात्कार विनयभंग, महिलांवर होणा-या अत्याचाराला आळा बसावा. याकरिता या कायद्याची गरज आहे. रासायनिक तज्ञांचा अहवाल विशिष्ट मुदतीत मिळायला पाहिजे, याबाबत तरतूद आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर गोष्टी लिहिल्या जातात. त्याला पायबंद घालण्यातकरिता विशेष तरतूदसुद्धा यात करण्यात आली आहे. अशी माहिती Adv. उज्वल निकम यांनी माध्यमांशी चर्चा करताना दिली.