वर्धेतही नावालाच दारूबंदी; अवैध विक्रीमुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडतोय

दारूबंदी करूनही चंद्रपूर जिल्ह्यात (the liquor ban in Chandrapur) मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याने शासनाने गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय (The decision drew mixed reactions) घेतला. या निर्णयानंतर सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. वर्धा जिल्ह्याची जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे.

  वर्धा (Wardha).  दारूबंदी करूनही चंद्रपूर जिल्ह्यात (the liquor ban in Chandrapur) मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत असल्याने शासनाने गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय (The decision drew mixed reactions) घेतला. या निर्णयानंतर सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. वर्धा जिल्ह्याची जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिले आहे.

  पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. त्यामुळे देशभरात वर्धा जिल्ह्याला वेगळी ओळख असल्याने महापुरुषांच्या जिल्ह्यात दारूबंदी करावी, अशी मागणी गांधी विचारकांनी सरकारकडे केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने 1974 मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली.

  त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याने तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून दारूबंदी हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर वर्धेचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी जिल्ह्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत आहे. त्यासाठी पोलिस विभागाला मनुष्यबळ खर्ची करावे लागते. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम परिसर व पवनार परिसर सोडून इतर ठिकाणची दारूबंदी उठवावी, अशी मागणीही राज्य शासनाच्या ग्रहविभागाकडे केली होती. त्यानंतर काही संघटनांकडून दारूबंदी उठविण्याची मागणीही करण्यात आली.

  मात्र, वर्धा जिल्ह्यात गांधीवादी विचारांच्या संघटनांनी दारूबंदी कायम ठेवण्यासाठी दबाव आणला. परंतु, आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. या ठिकाणी विक्री करण्यात येत असलेली दारू चांगल्या दर्जाची नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे दारूविक्रीतून शासनाला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

  लोकांची मानसिकता बदलण्याचा विचार करा
  चंद्रपूर येथे नावालाच दारूबंदी केली होती. अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरु राहिली. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत होता. वर्धेत गेल्या 46 वर्षांपासून दारूबंदी आहे. नुसता शासकीय स्तरावर दारूबंदी करून प्रश्न सुटत नाही तर लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. कायद्याने केलेल्या दारूबंदीचा वर्धा येथील प्रयोग अयशस्वी राहिलेला आहे.
  — अविनाश काकडे, गांधी विचारक

  अत्यंत वेदनादायी निर्णय
  चंद्रपूर येथील दारूबंदी उठविण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. दारूबंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असताना त्यास प्रतिबंध घातला नाही. त्यामुळे हा वेदनादायी निर्णय आहे. वर्धेची दारूबंदी कायम ठेवावी, प्रशासन निर्बंध लादू शकतात. ज्याचा वयक्तीक स्वार्थ आहे, त्यांनी दारूबंदी उठवली आहे. बंद करण्यासाठी सामाजिक संघटनांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले परंतु, त्यांचा विचार केला नाही.
  — मुरलीधर बेलखोडे, सामाजिक कार्यकर्ते

  वर्धेत दारूबंदी नाहीच
  वर्धेत शहरासह ग्रामीण भागात लपून छपून मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. नावालाच दारूबंदी आहे. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. दारूबंदी वैगेरे नाही तर त्यामुळे वर्धा येथील दारूबंदी उठायला पाहिजे. सामान्य लोकांना लुटणे आहे. अवैधरित्या शहरासह ग्रामीण भागात दारूविक्री केली जाते.
  — नुतन माळवी, सत्यशोधक महिला प्रबोधिनी वर्धा.

  शासन आणि प्रशासनाचा आशिर्वाद
  दारुबंदी झालीच पाहिजे पण ज्यांच्या घरातील व्यक्ती दारू पितात त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मग सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे निघतात. पण वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केवळ कागदावर असून त्यासाठी शासन आणि प्रशासनाचा आशिर्वाद आहे.
  — सुनीता झामरे, सामाजिक कार्यकर्त्या