सलून व्यावसायिकावर झालेल्या हल्ला प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देताना सलून व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी
सलून व्यावसायिकावर झालेल्या हल्ला प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देताना सलून व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी

बोरगाव (मेघे) येथील सलून व्यवसायिक व त्यांचे कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा सलून व्यवसायिकांनी निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिका-यांना अलीकडेच देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

वर्धा (Wardha).  बोरगाव (मेघे) येथील सलून व्यवसायिक व त्यांचे कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा सलून व्यवसायिकांनी निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिका-यांना अलीकडेच देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बोरगाव मेघे येथील सलून व्यवसायिक रामेश्वर कावळे यांचेवर अजय कावळे नामक युवकाने सहका-यांच्या मदतीने हल्ला केला. या घटनेमुळे सलून व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणातील दोषी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सलून व्यावसायी संदीप अंबुलकर, दिनेश पोहनकर, राहुल अतकरे, नीलेश खरोडे, स्वप्निल घुमे, रवींद्र फुलबांधे, राजेंद्र अतकर, अजय घुमे, चंदु उरकुडे, सचिन लाडेकर, बंटी घुमे, प्रफुल्ल उरकुडे, उमेश किनारकर, आशीष इझनकर, लिलाधर येऊलकर, विवेक अतकर यांची उपस्थिती होती.