राजमाता जिजाऊ स्मारक लोकार्पण सोहळा; वर्धेत साकारला आई जिजाऊचा पुतळा

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता जिजाऊ माता स्मारकाच्या लोकार्पण सोहळयाचे आयोजन दादाजी धुनिवाले चौक नागपूर रोड नालवाडी येथे करण्यात आले आहे.

वर्धा (Wardha).  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता जिजाऊ माता स्मारकाच्या लोकार्पण सोहळयाचे आयोजन दादाजी धुनिवाले चौक नागपूर रोड नालवाडी येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार रामदास तडस तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.पंकज भोयर उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नुतन राऊत,नालवाडी पंचायत समिती सदस्य चंदा सयाम सरपंच प्रतिभा माऊस्कर, उपसरपंच महेश शिरभाते, ग्रामविस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक, ग्रामपंचायत सदस्य वैभव सुर्यवंशी, नरेश रुद्रकार, अशोक कावळे, किशोर कुहीकर, अमोल मानकर ,रंजित इवनाते,सतिश काचोळे, ग्रामपंचायत सदस्य गिता मडावी, प्रतिभा वाळके, रिता वनकर,वैशाली सातपुते,कान्होपात्रा धनविज, योगिता ऊईके, सुनिता मेहेरे, योगिता डोंगरे, कविता खल्लारकर आदी उपस्थित राहतील. चौकाचौकात थोर महाम्याचे पुतळे उभारणे हे जिल्ह्याचे प्रतिक आहे.

वर्धा येथे महात्मा गांधी, शिवाजी महाराज, बजाज, टिळक , शास्त्री आदी महापुरुषांचे पुतळे वर्धा येथे साकारण्यात आले आहे. हे पुतळे नागरिकांकरिता प्रेरणादायी तसेच आकर्षक ठरणारे आहे. याच पार्श्वभुमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे संगोपन करुन देशप्रेमाचे धडे देणा-या मॉ. जिजाऊ माता स्मारकाचे लोकार्पण करण्यात येत आहे.जिजाऊचे समारक महिलांकरिता प्रेरणादायी ठरणारे आहे. नागपूरवर वर्धेत प्रवेश करणा-या नागरिकांना मॉ.जिजाऊच्या पुतळयाचे दर्शन् घडणार आहे. जिजाऊ स्मारक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे तितकेच खरे!

 सिंदखेडराजाच्या धर्तीवर स्मारकाची उभारणी
आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या अथक प्रयत्नाने तसेच मराठा सेवा संघाच्या सहयोगाने सर्वप्रथम वर्धेमध्ये जिजाऊ राजमाता स्मारक उभारण्यात आले. हे स्मारक सिंदखेडराजाच्या धर्तीवर उभारण्यात येत आहे हे विशेष! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा जल्लोषात साजरा न करता साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमात शासन नियमांचे पालन करुन मास्कचा वापर, सोशल डिस्टिन्संचा वापर करण्यात येईल. — योगिता इंगळे जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

नालवाडीत स्मारक उभारणे म्हणजे गावाचा लौकिक
जिजाऊचे स्मारक व्हावे अशी अनेक संघटनांची मागणी होते.अशातच नालवाडी येथे जिजाऊंचे स्मारक उभारण्यात येत आहे. यामुळे आमच्या गावाचा नावलौकीक होणार हेही तेवढेच खरे. जिजाऊ स्मारक नालवाडीत उभारण्याचे सर्वस्वी श्रेय मी आमदार डॉ.पंकज भोयर यांना देते.त्यांच्या प्रयत्नानेच जिजाऊंच्या जयंती दिनी स्मारकाचे लोकार्पण होत आहे.– प्रतिभा माऊस्कर, सरपंच-नालवाडी