भाजप खासदाराच्या सुनेने राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांकडे केली मदतीची मागणी; धक्कादायक प्रकार

चाकणकर यांनी म्हटले आहे की, या चित्रफितीनंतर त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून त्यांना मदत मिळवून दिली शिवाय वर्धा येथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यानी पुजा यांना भेटून त्यांची विचारपूस करत पोलीसात गुन्हा दाखल करत सुटका केली आहे.

    वर्धा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी व्टिट करत खळबळजनक दावा केला आहे की, वर्धा येथील भाजप खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सुनेने चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे चित्रफित पाठवून घरगुती हिंसाचारापासून सुटका करण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. या चित्रफितीमध्ये तडस यांच्या सुनेने (Doughter in law) कुटुंबाकडून मारहाण व अत्याचार होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे.

    कुटूंबियाकडून छळ होत असल्याचे गंभीर आरोप
    रामदास तडस यांच्या सुनेची चित्रफित रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केला आहे. त्यात भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटूंबियाकडून छळ होत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या चित्रफितीमध्ये त्यानी म्हटले आहे की, ‘मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, मी विनंती करते.

    राष्ट्रवादीकडून तातडीने मदत