युवा जंगोम दल देवळीच्या तहसिलदारांना निवेदन देताना
युवा जंगोम दल देवळीच्या तहसिलदारांना निवेदन देताना

इंझाळा (Enzala) : गोंड समुदायाचे श्रध्देय पुरूष असलेल्या रावण दहनाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंडवाना युवा जंगोम दलाचे वतीने वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

  • देवळीच्या तहसिलदारांना निवेदन दिले

इंझाळा (Enzala) : गोंड समुदायाचे श्रध्देय पुरूष असलेल्या रावण दहनाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंडवाना युवा जंगोम दलाचे वतीने वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कित्येक वर्षापासून आम्ही दस-याचे दिवशी रावण दहनाला परवानगी देण्यात येवु नये, अशी मागणी आम्ही करीत आहो. परंतु, आमच्या भावनांचा विचार न करता धार्मिक रिती रिवाजाचे नावावर रावण दहनास परवानगी देण्यात येत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावतात. शासनाशी आम्ही थेट संपर्क साधु शकत नाही. यामुळे प्रशासकीय अधिका-यांकडे आमच्या समस्या मांडतो. त्यांनी आम्हाला सहकार्य करीत योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असते. आमच्या भावनांचा विचार न करता राण दहनास परवानगी देण्यात येते. या प्रकार अनुचित आहे. अधिकारी हिंदू धर्मिय असल्याने जाणीवपूर्वक परवानगी देण्यात येते, अशी आमची धारणा झाली आहे. दुष्कृत्य आणि घटनाबाह्य कृती करण्यास भारतीय घटना परवानगी देत नाही. रावण दहनास देण्यात येणारी परवानगी भारतीय दंड विधान आणि संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद आहे. याची माहिती आम्हाला देण्यात यावी. यांसह देशाचा इतिहास तपासून आपण उत्तरे दयावीत.

देशात छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, पेशवे ते इंग्रज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यतचा इतिहास उपलब्ध आहे. रावण दहन करणे ही जुनी धार्मिक परंपरा असल्याचा भ्रम तयार करून देशभरात रावण दहन करण्यात येते. धार्मिक व जुनी परंपरा असती तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात कितीदा रावण दहन करण्यात आले. हिंदू धर्म जोपासणा-या पेशव्यांनी रावण दहन केले. इंग्रजांच्या काळात तरी रावण दहनाचा इतिहास उपलब्ध आहे का? नागपूर हे विश्व हिंदू परिषदेचे सत्ता केंद्र आहे. त्याच नागपुरात 14 ऑक्टोंबर 1956 ला दिक्षा घेतली. त्या दिवशी तरी नागपुरात रावण दहनाचा इतिहास उपलब्ध आहे का? या प्रश्नांची उत्तरे देण्यात यावी. अन्यथा रावण दहनास परवानगी देण्यात येवु नये.

परवानगी देण्यात आल्यास युवा जंगोम दलाचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी युवा जंगोम दलाचे तालुका समन्वयक सुरेंद्र वरठी, तालुका संघटक कुंदन कुमरे, योगेश वरठी, मुकेश ताडाम, दिनेश आत्राम, विक्की सिडाम, रोहन येडमे, मंगेश आत्राम, संदेश उईके, सतीश खडसे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.