wardha aandolan

मराठा समाजाला ओबीसीप्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु, त्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे. मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे

वर्धा. ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने वकीलाची नियुक्ती करावी. ओबीसी समाजाचे आरक्षणाला धोका न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. या मागणीकरिता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सिव्हील लाईन येथील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, समता परिषदेचे  संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांचे अथक प्रयत्नामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. यामुळे ओबीसींना शिक्षण  व नोकरीमध्ये २७ टक्के आरक्षण मिळण्यास सुरवात झाली. यानंतरही उच्च शिक्षणात आरक्षण मिळण्यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलने करण्यात  आली. यानंतर  ओबीसींना उच्च शिक्षणासाठी आरक्षण केवळ दहा टक्के देण्यात आले. परंतु, मुंबई व दिल्ली येथील न्यायालयात याचिका दाखल करीत ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा घाट रचला जात   आहे.

मराठा समाजाला ओबीसीप्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु, त्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे. मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याकरिता राज्य  सरकारने वकीलांची नियुक्ती करावी. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यानंतर निवेदन देतेवेळी समता परिषदेचे प्रा. दीवाकर गमे, ईश्वर बाळबुधे, सुनील राऊत, जगदीश जुनघरी, निळकंठ पिसे, विनय डहाके, विशाल हजारे, निळकंठ राऊत, भारत चौधरी,  पुंडलिक, नागतोडे, केशव तितरे, कवडु बुरंगे, कविता मुंगले, किरण कडू, रेखा खेलकर, जयश्री भगत, वैशाली ठाकरे, वैशाली देवगिरकर, सुनील सावध, श्याम जगताप, हेमराज हरणे, जयवंत भालेराव, संजय म्हस्के, सुरेश सातोकर, आकाश पारधी, किशोर पिपरे, प्रदीप देशकर यांच्यासह परिषदेचे अन्य सदस्य व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.