जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल; मॉल्स, चित्रपटगृहे बंद आणि दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा

शासनाने ४ जून रोजी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हयातील कोविड सकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांची टक्केवारी (the percentage of patients) 7.57 टक्के असून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी (percentage of oxygen beds) 4.04 एवढी आहे. जिल्ह्याचा लेवल तीनमध्ये समावेश असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (District Collector Prerna Deshbhratar) यांनी जिल्ह्यातील निर्बंध सोमवार 7 जून सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्याचे आदेश पारित केले आहेत.

  वर्धा (Wardha). शासनाने ४ जून रोजी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हयातील कोविड सकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांची टक्केवारी (the percentage of patients) 7.57 टक्के असून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी (percentage of oxygen beds) 4.04 एवढी आहे. जिल्ह्याचा लेवल तीनमध्ये समावेश असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (District Collector Prerna Deshbhratar) यांनी जिल्ह्यातील निर्बंध सोमवार 7 जून सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्याचे आदेश पारित केले आहेत. या निर्णयामुळे व्यापारी, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  अत्यावश्यक वस्तू व सेवासंबधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मुभा आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 50 टक्के आसन क्षमतेनुसार डाईन-इन व शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व घरपोच सुविधा मिळेल. सार्वजनिक ठिकाणे क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग व इव्हीनिंग वॉक, सायकलिंग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

  खाजगी आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत अपवाद- खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैरबँकींग वित्तसंस्था यांची कार्यालये नियमीतपणे सुरु राहतील. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून उद्योग, व्यवसाय करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

  कार्यालयात ५० टक्के उपस्थिती
  शासकीय/ निमशासकीय/ खाजगी- क्षमतेच्या 50 टक्के कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपुर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

  विवाहासाठी ५० लोकांना परवानगी
  विवाह समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत करता येईल. तर अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल. क्रिडा व मनोरंजन बाहेर मोकळया जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार 50 टक्के उपस्थितीत सभागृहाच्या क्षमतेच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत घेता येईल. सभा/ निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा- क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहता येईल.

  जीम ५० टक्के क्षमतेने सुरू
  जीम / सलुन / ब्युटीपार्लर / स्पा / वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह पूर्वपरवानगीसह, वातानुकुलित वापरास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदी, जमावबंदी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, संचारबंदी सायंकाळी 5 नंतर असेल.

  वाहतूक पूर्ण आसनक्षमतेने सुरू
  सार्वजनिक बस वाहतुक पूर्ण आसनक्षमतेने परंतु, प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. कोविडविषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक खाजगी कार, टॅक्सी, बस नियमीतपणे पूर्णवेळ सुरू राहील. पण जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक असेल. कृषी संबंधीत बाबी दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

  कोरोना चाचणी बंधनकारक
  सर्व उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता 15 दिवसांकरीता) निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत संबधित दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच दंड आकारण्यात येईल.