खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी आमदार केचे यांची आढावा बैठक

आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कृषी विभागातर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये आमदार केचे यांनी खरीप पिकाबाबत आढावा घेतला.

    आर्वी (Arvi).  येथे आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कृषी विभागातर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये आमदार केचे यांनी खरीप पिकाबाबत आढावा घेतला.

    बैठकील उपविभागी कृषी अधिकारी सतीश सांगले, आर्वी तालुका कृषी अधिकारी वायफळ, कारंजा कृषी अधिकारी गुल्हाणे, नडगिरी, कोंडवते, पंधरे, दुभे, बोरकर आदि बैठकीला उपस्थित होते. यावेळी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे शहरी तथा ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असताना खोडमाशी, अतिवृष्टी, गारपीट बोंडअळीमुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस येऊन मोठ्या आर्थिक टंचाईचा सामना करत आहे. कोरोना संकटात शेतक-यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. अशा कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करून चांगल्या प्रतीचे बियाणे, खत, शेती व्यवसायाशी निगडित इतंबूत अवजारे उपलब्ध होण्यासाठी मदत करावी.

    बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकरी , खोडमाशी, चक्रभुंगा, मोझॉक रोग यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिक उत्पादक शेतकरी, गारपीट व अतिवृष्टीने नुकसान झालेले फळबाग उत्पादक व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापही मदत मिळाली नाही. सोयाबीन बियाण्याच्या कमतरते मुळे बियाणांची कमतरता भासण्याची दाट शक्यता आहे.