प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा जिल्ह्यातील शेकापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार हे सरपंच अशा दोन्ही पदावर कार्यरत आहे. धान्य वाटप करताना ते महिलांना असभ्य वागणूक देत आहे. असे महिला ग्राहकांचे म्हणने आहे. संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावातील महिला ग्राहकांनी केली आहे.

वडनेर (wadner). वर्धा जिल्ह्यातील शेकापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार हे सरपंच अशा दोन्ही पदावर कार्यरत आहे. धान्य वाटप करताना ते महिलांना असभ्य वागणूक देत आहे. असे महिला ग्राहकांचे म्हणने आहे. संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावातील महिला ग्राहकांनी केली आहे.

येथील स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटपात हलगर्जीपणा करीत आहे. महिला धान्य घेण्यासाठी आल्यास त्यांना धान्य देण्यात येत नाही. कोणाकडेही माझी तक्रार करा. माझं काही वाकड करू शकत नाही. मी माझ्या मर्जीप्रमाणे धान्य वाटप करेल. असे म्हूणन धान्य वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहे. महिलांनी धान्य का देत नाही, अशी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करण्यात येते. महिला स्वस्त धान्य घेण्यासाठी गेल्या असता स्वस्त धान्य दुकानादार् देविदास पाटील व त्यांचा मुलगा स्वप्निल पाटील यांनीं महिलांना मारहाण केली. या प्रकरणी वडनेर पोलिसांत तक्रार करण्यात आली. परंतु, दुकानदाराचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे शेकापूर येथील महिलांनी तहसीलदारांकडे न्याय मागितला आहे.